कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीसमोर टोमॅटो फेकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदवला. शहरातील बसस्थानकाजवळील उड्डाणपूल भागात ही घटना घडली. यावेळी पोलिस बंदोबस्तही होता परंतु,अचानक झालेल्या या प्रकारामुळे काहीसा गोंधळ उडाला आणि त्याच परिस्थिती खोत यांच्या वाहनांचा ताफा पुढे निघून गेला. या विरोधामुळे सदाभाऊ खोत चांगलेच संतापले आहेत. त्यांनी थेट राजू शेट्टी यांना आव्हान देत चिलटासारखे आंदोलन करू नका असे म्हणत मैदानात येण्याचे आव्हान दिले.
सदाभाऊ पाथरीत पीक
कर्जाच्या आंदोलनात मृत्यू पावलेल्या तुकाराम काळे या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयाना
भेट देणार होते. परंतु यालाही स्वाभिमानी आणि भाकपच्या कार्यकर्त्यांनी विरोध
केला. त्यामुळे सदाभाऊंना ती भेटही रद्द करावी लागली. यामुळे सदाभाऊ खोत चांगलेच संतापले
आणि त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राजू शेट्टी यांच्यावर कडाडून टीका
केली.
















